मुंबई : सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार व अनेक कुरबुरी चालुच असल्याचे दिसून आले होते. काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी निधी वाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगत आपली नाराजी उघड केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीत उभी फूट निर्माण होत असून काँग्रेसचे तब्बल ११ आमदार नाराज असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते.
दरम्यान, “ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. निधी 31 मार्चच्या आधीचे होते. येणारा नवीन फंड आम्ही तुमच्या नगरपालिकेला देणार आहोत” असे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध धरणांचे जलपूजन!
याबरोबरच गोरंट्याल यांनी अजित पवारांवर विश्वास देखील व्यक्त केला आहे. “दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल म्हणाले.
वंचित सह विश्व वारकरी सेनेचे विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन…
निधी वाटपावरून नाराज असलेले आमदार आता उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आले आहेत. खुद्द अजित पवार यांनी या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी बोलावले असून, अजित दादा कसा तोडगा काढणार हे महत्वाचे ठरणार आहे.
तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, “आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे सांगितले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
