🕒 1 min read
मुंबई : निधीवाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नाराज काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी योग्य निधी वाटपाचं आश्वासन दिल्यास सांगत आमची नाराजी दूर झाली असून उपोषण न करण्याचे जाहीर केले होते.
यानंतर त्यांनी सकाळी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी ते शेरो-शायरीच्या अंदाजात दिसून आले. “जितना चाहा उतनी मोहब्बत नहीं मिली, मुनाफे का छोड़ीए, लागत भी नहीं मिली, कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी शौहरत ना मिली” अशी शायरी त्यांनी ऐकवली.
मोठी बातमी: काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला!
दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडले आहे. “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी पहिली प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध धरणांचे जलपूजन!
“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असल्याचे देखील थोरात यांनी स्पष्ट केले. “आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही. मतदार संघाच्या प्रश्नांसाठी आमदार नाराज आहेत. आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
वंचित सह विश्व वारकरी सेनेचे विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
