🕒 1 min read
सोलापूर प्रतिनिधी : ३१ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा अॅड. प्रकाश आंबेडकर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक लाख वारकऱ्यांचा सह प्रवेश करणार आहेत. या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने वारकऱ्यांच्या नियोजन बैठका घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. या बैठकीत काहीही झाले तरी तारखेला विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन करायचेच असा एल्गार पुकारण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यासह देशभरातील सर्वच मंदिरे, श्रद्धास्थाने, मशिद, चर्च, बुद्ध विहार, गुरुद्वारे शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणाच्या कडून राज्य आणि केंद्र सरकार महाराष्ट्रातील सामान्य जनतेला वेठीस धरीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आला आहे. त्यातूनच राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. हाच धागा पकडून लॉक डाऊनमध्ये बंद असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शन व भजन किर्तनासाठी सुरु करण्याची मागणी विश्व वारकरी सेनेनेकडून करण्यात आली आहे.
यासाठी ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर प्रवेश आंदोलनात अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्व वरकरी सेनेचे प्रदेश प्रवक्ते तुकाराम भोसले महाराज यांनी महाराष्ट्रदेशी बोलताना दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहावर या आंदोलनाची नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे, नानासाहेब कदम, बबन शिंदे, शिवाजी बनसोडे, विश्व वारकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोंढे, प्रकाश सोनटक्के, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र आवारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विश्व वारकरी सेनेच्या आंदोलनास पाठींबा दिला.
या प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे निरंजन क्षिरसागर, अॅड. दत्तात्रय कापुरे, विजय भालेराव, समाधान वाघमारे, ह.भ.प. शरद शिंगाडे महाराज, ह.भ.प. रामचंद्र चवरे महाराज, ज्ञानेश्वर चवरे, श्रीकांत जवंजाळ, महादेव जवंजाळ, दत्ता मोरे, अभिमान पाटोळे, तानाजी मुळे, हरि मुळे, ह.भ.प. हनुमंत भोसले महाराज, योगेश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, रोहिदास कसबे, तुकाराम पारसे, सचिन गवळी, केशव पवार, आनंद आवचारे, लक्ष्मण मेटकरी, अजय सोनवणे, देवा साबळे, अमोल तुपसमिंदर, राज जगताप, अरूण सोनवणे, निखिल फडतरे, मोहन रणदिवे, सुधाकर बनसोडे, प्रदिप फडतरे आदीउपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन अॅड. आकाश कापुरे यांनी केले. तर आभार वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र आवारे यांनी मानले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
