सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर मंगळवेढा या चौपदरी महामार्गाचे काम करणाऱ्या डी बी एल कंपनी ने मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कंपनीने शासकीय योजनांचे नाव पुढे करून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून लाखो ब्रास मुरूम दगड आणि काळी माती उचलून फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनी एका निवेदनाद्वारे केली.
गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर मंगळवेढा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका शासनाने डी. बी. एल. या कंपनीला दिलेला आहे. हे काम करत असताना आपले पैसे वाचावे या हेतूने कंपनी व्यवस्थापनाने या परिसरातील शेतकऱ्यांना हा रस्ता शासनाची योजना असल्याचे सांगत त्यांच्या शेतातून काळी माती मुरूम आणि दगड यांचे उत्खनन करून रस्त्यासाठी वापरले आहे.
आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार देखील नाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा खुलासा
वास्तविक पाहता यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला कवडीचाही मोबदला दिलेला नाही. बी बी एल कंपनीने ज्या भागात उत्खनन केले आहे तो भाग माळढोक अभयारण्य क्षेत्रात येतो. तरीही या कंपनीने शासनाचे नियम धाब्यावर बसवत मुरूम माती आणि दगड उत्खनन करून या भागातील शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना केला.
विमानतळाच्या ‘त्या’ निर्णयाबाबत मनसेने घातली मराठी माणसाला साद
संबंधित कंपनीचे अधिकारी व त्यांना सहाय्य करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास सोलापूर मंगळवेढा महामार्गावर कामती येथे रस्ता रोको आंदोलन इशारा देखील त्यांनी दिला आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, मोहोळ तहसीलदार, कामती पोलीस प्रशासन यांच्यासह महसूल प्रशासनाला दिले आहे.
“काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्यानेच करावे” ; संजय राऊतांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला
यावर काँग्रेस मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष गौरव खरात म्हणाले, “शासकीय परवानगी नसताना बी बी एल कंपनीने लाखो ब्रास मुरुम चोरी केला आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊन या परिसरातील शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून मुरुम उचलला आहे. त्या शेतकन्यांना मुरुमाच्या मोबदल्यात चार पट नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.” असा इशारा देखील दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
