Share

कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करा, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर प्रतिनिधी – कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. शिक्षण विभागाच्या १५ जून च्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक केले आहे. मात्र प्रशासनाने शिक्षकांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील शिक्षक कोरोना सर्वेक्षण, ट्रेसिंग, टोलनाके, क्वॉरंटाईन सेंटर, पोलीस सहाय्यक इत्यादी कामे प्रामाणिकपणे करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद, शिक्षण चालू हा उपक्रम सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, नवनवीन व्हिडिओ तयार करून पाठवणे, ऑनलाइन शिकवणे अशा विविध प्रकारे शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पवरुन राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल, धैर्यशील मोहिते पाटील यांचा गंभीर आरोप

मात्र एकाच शाळेतील बहुतांश शिक्षकांना कोरोना ड्युटी दिलेली आहे. मात्र प्रशासन शालेय कामकाज पाहण्यासाठी मुख्याध्यापक गरजेचे असताना त्यांना ड्युटी देणे, महिला शिक्षकांना ड्युटी देणे, यापूर्वी केलेले कामावर पुन्हा पुन्हा ड्युटी देणे, शिक्षक पती-पत्नीना ड्युटी देणे, शाळेतील लिपिक शिपाई यांना ड्युटी देणे यांसारखे प्रकार सुरू केले आहेत.

सोलापूर मंगळवेढा रस्ता चौपदरी कामासाठी डीबीएल कंपनीने उचलला बेकायदेशी मुरूम; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

वास्तविक पाहता ऑनलाईन तसेच ऑफलाइन कामासाठी शाळेत लिपिकाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना कोणता ऑनलाइन अभ्यासक्रम द्यायचा आहे याबाबतची व्यवस्थापन करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची गरज असते. मात्र शिक्षकांना कोरोना कामाचा कोणता आहे तांत्रिक अनुभव नसताना त्यांना ट्रेसिंगचे काम देणे, क्वॉरंटाईन सेंटरला नाईट ड्युटी देणे, अपंग शिक्षकांना ड्युटी देणे, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या तसेच हृदय शस्त्रक्रिया झालेल्या तसेच विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या शिक्षकांना कोरोना ड्युटी देणे अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षकांमधून पुढे आल्या आहेत. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार देखील नाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

या मागणीची प्रशासन स्तरावरून अद्यापपर्यंत दखल घेतली नसल्याने येत्या २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्य आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे शहराध्यक्ष राजेश काडादी, शहर सचिव राजकुमार देवकते, जिल्हा उपाध्यक्ष हणमंत चव्हाण, जिल्हा सहसचिव प्रताप दराडे, कोषाध्यक्ष रियाज अहमद अत्तार यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!