Share

कोरोना बाधित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशातच शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपचार चालू असतानाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गोरक्ष महादेव मतकर (वय 33) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

मृत्य झालेली व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मूळ रहिवाशी आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे. मृत व्यक्तीवर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पवरुन राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल, धैर्यशील मोहिते पाटील यांचा गंभीर आरोप

ह्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोलापूर मंगळवेढा रस्ता चौपदरी कामासाठी डीबीएल कंपनीने उचलला बेकायदेशी मुरूम; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!