🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळाचा ७४ टक्के वाट खरेदी करण्याची तयारी सध्या अदानी समूहाने केली आहे. तर तिरुवनंतपुरम विमानतळ केरळ सरकारने अदानी समुहाकडे न देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला साद घालत विमानतळाच्या निर्णयाबाबत मराठी माणसाला विश्वासात घ्यायला पाहिजे की नाही, असा सवाल मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विटद्वारे उपस्थिती केला आहे.
ट्विटमध्ये शिदोरे म्हणाले, `तिरुवनंतपुरम विमानतळ अदानींना देऊ नये, अशी भूमिका केरळ घेणार असेल तर मुंबई विमानतळ किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाबत महाराष्ट्राची भूमिका काय आहे? सार्वजनिक मालकीची संसाधन – ज्यांच्यावर लोकांचा अधिकार आहे. विकताना स्थानिक मराठी माणसाला विश्वासात घ्यायला पाहिजे की नाही?’
“काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्यानेच करावे” ; संजय राऊतांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला
तिरुवनंतपुरम विमानतळ अडानींना देऊ नये अशी भूमिका केरळ घेणार असेल तर मुंबई विमानतळ किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाबत महाराष्ट्राची भूमिका काय आहे? सार्वजनिक मालकीची संसाधनं – ज्यांच्यावर लोकांचा अधिकार आहे – विकताना स्थानिक मराठी माणसाला विश्वासात घ्यायला पाहिजे की नाही? pic.twitter.com/CqrSUxgboF
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) August 25, 2020
शिदोरेंच्या या ट्विटमुळे मनसे पुन्हा मराठी माणसाच्या हक्कासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येते. देशातील सहा विमानतळ अदानी समुहाने देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतली असून आता मुंबई विमानतळाकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ही खासगी कंपनीच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही सार्वजनिक मालमत्ता आहे, ती विकताना स्थानिक मराठी माणसाला प्राधान्य सरकारने दिले पाहिजे की नाही, यावर शिदोरेंनी ट्विट केले आहे.
काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज आमदारांची अजितदादांनी काढली समजूत! महाविकास आघाडीत पुन्हा सर्व आलबेल?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
