नवी दिल्ली : २०१९ लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये राहुल गांधी यांची तत्कालीन अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने देशभरात बहुमत मिळवत केंद्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली.
या निवडणुकांच्या निकालाने काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे या पराभवाची नैतिकता स्वीकारत राहुल गांधी यांनी जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज आमदारांची अजितदादांनी काढली समजूत! महाविकास आघाडीत पुन्हा सर्व आलबेल?
काल काँग्रेस कार्यसमितीच्या तब्बल ७ तास झालेल्या बैठकीनंतर हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पुढील ६ महिने काँग्रेस अध्यक्षपदी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरूनच आता राज्यसभा खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला त्यांनी सल्ला दिला आहे.
तुकाराम मुंढेंचा ‘तो’ दावा खरा की खोटा ? महापौरांनी केले समितीचे गठन…
“काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीतील मुद्दे हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधीपक्ष आहे. काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे, त्यातून पक्षाने सावरावे. देशभरातील प्रत्येक गावात, अगदी उत्तर आणि पश्चिमेपासून ईशान्य भारतापर्यंत, प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. पण विरोधीपक्ष म्हणून त्यांनी उभारी घ्यावी” असे त्यांनी स्पष्ट केले.
खा. सुजय विखेंना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला; मनसेची आक्रमक मागणी
दरम्यान, “गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली जाते. ती तितकीशी संयुक्तिक नाही. पक्षाचे नेतृत्व करण्यासारखे गांधी परिवाराबाहेरील कोणी दिसत नाही. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनीच जबाबदारी उचलावी. सोनिया गांधी सध्या आजारपाने क्षीण झाल्या आहेत. परंतु राहुल किंवा प्रियांका गांधी यांनी नेतृत्व करायला हवे”, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
