Share

तुकाराम मुंढेंचा ‘तो’ दावा खरा की खोटा ? महापौरांनी केले समितीचे गठन…

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : कोविडग्रस्तांसाठी दहा हजार खाटा उपलब्ध असल्याचा दावा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी महापालिकेतील सर्वपक्षीय बैठकीत केला होता. त्यानंतर या खाटांची उपलब्धता तपासण्याकरिता महापौरांनी समितीचे गठन करून रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेसंदर्भात पाहणी करवून घेतली. या समितीचा अहवाल आज (ता. २५ ऑगस्ट) सादर होण्याची शक्यता आहे.

शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेकडे खाटांचा तुटवडा असल्याचे सांगत आयुक्तांवर अनेक आरोप केले होते. तर आयुक्तांनी कोविडग्रस्तांसाठी दहा हजार बेडची उपलब्धता असल्याचा दावा केला होता. महापौर संदीप जोशी यांनी कोविड-१९ बद्दल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठीत केली आहे. समितीची बैठक सोमवारी मनपा मुख्यालयात पार पडली. बैठकीत मनपाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. योगेंद्र सवाई यांनी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती दिली.

खा. सुजय विखेंना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला; मनसेची आक्रमक मागणी

शहरातील २४ खासगी रुग्णालयांमध्ये १,८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सद्यस्थितीत खासगी रुग्णालयात ५७५ बेड्स उपलब्ध आहेत. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत. त्यात ३४० रुग्ण भरती आहे, आयजीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत. त्यात २९५ रुग्ण भरती आहे. दोन्ही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध आहे.

तुकाराम मुंढेंची ही काही पहिलीच चाचणी नव्हे, कितीदा झाली आहे चाचणी…….. वाचा

कोविड केअर सेंटरबाबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टल आणि वनामतीमध्ये २,८०० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४,७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहे. तसेच ३,३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येसुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आल्याचे सांगितले.

सोलापुरात भाजपा नगरसेवकाच्या मेहेरबानीनेच अवैध धंदा; नगरसेवकासह पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

आज सादर होणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण मुंढेंची कोरोना चाचणी पॉजिटिव आल्याने काल सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहिलेले नेतेही अलगीकरणात जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!