🕒 1 min read
सोलापूर : शहरातील कुंची कोरवी गल्ली येथील मटका बुक्की आणि जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेचे पथकाने छापा मारला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात एक जण पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने मयत झाला. परवेझ नुरोद्दीन इनामदार (वय ४२ वर्षे रा. सोलापूर) असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी भाजपच्या एक नगरसेवक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह ४० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरातील कुंची कोरवी गल्लीत बेकायदेशीर मटका बुकी व जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे शाखेचे पथक कारवाई साठी रवाना झाले होते. पोलिस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.
पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये काही लोक जुगार खेळत होते. त्यातील काही जणांनी मागील दरवाजातून उडी मारून धूम ठोकली. यावेळी परवेझ नुरोद्दीन इनामदार ( वय ४२ ) हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली.
‘परत या परत या, राहुल गांधी परत या’ ; भाजपा नेत्यांची उपरोधिक टीका
दरम्यान, पोलिस पथकाने २२ मटका बहाद्दर आणि जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर १८ लोक पळून जाण्यात यशस्वी ठरले. या जुगाऱ्यांमध्ये भाजपचे नगरसेवक सुनील कामठी यांच्यासह पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी याचाही समावेश होता. या प्रकरणी सोलापूर शहर जेलरोड पोलिस ठाण्यात ४० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस विश्वासह राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या ‘या’ ढाण्या वाघाला कोरोनाचा घेराव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
