Share

सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक ; सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उद्या (सोमवारी) काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक पार पडणार असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, पुढचा अध्यक्ष कोण असणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदी यापुढे गांधी घराण्यातील व्यक्ती नको’ असे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केले होते. हे वक्तव्य प्रदीप छब्बर आणि हर्ष शाह या सोडन मिळून संपादन केलेल्या ‘इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन वुईथ द नेस्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकात लिहिले आहे. प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील हे वक्तव्य या पुस्तकात छापण्यात आले आहे.

राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे –  जयंत पाटील

२०१९  लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची नैतिकता स्वीकारून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षामध्ये पुढील अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. ज्यातील एक गट हा राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करणारा आहे. तर, दुसरा गट हा गांधी घराणे सोडून इतर अध्यक्ष करावा या विचारांचा आहे . हा दुसरा गट आपले मत जाहीरपणे प्रकट करू शकत नाही.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नाहीच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!