Share

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने निवृत्ती घेऊन तासभरही झाला नाही त्यातच मित्र सुरेश रैनाने देखील आपली निवृत्ती जाहीर केलीये.

गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.

“भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी संपूर्ण कारकिर्दित त्यांने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही. धोनीचं यष्टीरक्षण, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याचा संयम, आव्हानात्मक परिस्थितीतला आत्मविश्वास, मैदानात ‘कॅप्टन कूल’ म्हणून वावरणं, त्याने देशाला जिंकून दिलेला विश्वचषक हे सारं नेहमीच आनंद देत राहील’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेंद्रसिंह धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. .

धोनीने भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. युवा खेळाडूंसाठी, नव्या पिढीसाठी महेंद्रसिंह धोनी हे नाव नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील. धोनीच्या पुढील वाटचालीसाठी, कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा..” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेंद्रसिंह धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहिर केलेला भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यालाही उपमुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदरच करतो, अविनाश जाधव यांचं शिवसेना खासदार-आमदाराला प्रत्युत्तर

शिवसेने नंतर राष्ट्रवादीने फोडला कॉंग्रेस पक्ष ‘हा’ बडा नेता करणार प्रवेश

खुशखबर! पुणेकरांची पीएमपीएमएल बससेवा होणार पूर्ववत; लवकरच सेवेत होणार रुजू

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!