🕒 1 min read
मुंबई : भाजपा आणि काँग्रेस हे सुरुवातीपासूनच विचारधारा वेगवेगळ्या असल्याने विरोधक आहेत.२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपाने देशात पुन्हा सत्ता आणली. अनेक राज्यात देखील भाजपाने जम बसवत, तर काही ठिकाणी आकड्यांचं गणित बसवत सत्ता स्थापन केली. कोरोना काळात देखील अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.
भारत-चीन मुद्द्यावरून तर राहुल गांधींनी मोदींच्या हिम्मतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप लावले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मात्र थेट फेसबुकवरच एक आरोप लावत आश्चर्यकारक मागणी केली आहे. काही वेळापूर्वीच नितीन राऊत यांनी ट्विट केले आहे. फेसबुक हे भाजपाच्या अनेक मनसुब्यांना खतपाणी घालत असून देशाला व देशाच्या लोकशाहीला घातक ठरत असल्याचा आरोपच त्यांनी फेसबुकवर लावला आहे.
खुशखबर! पुणेकरांची पीएमपीएमएल बससेवा होणार पूर्ववत; लवकरच सेवेत होणार रुजू
नितीन राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ प्रिय फेसबुक, तुझे भाजपासोबत असलेले संबंध जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घातक ठरत आहेत. कृपया आपल्या स्वतः च्या व्यवसायात लक्ष घाला आणि भारताच्या लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपाचे साथीदार होऊ नका ‘, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हे ट्विट चर्चेचा विषय ठरत असून भाजपावर लोकशाही घातक असा गंभीर आरोप देखील लावला आहे.
https://twitter.com/NitinRaut_INC/status/1294891263397781509
शिवसेने नंतर राष्ट्रवादीने फोडला कॉंग्रेस पक्ष ‘हा’ बडा नेता करणार प्रवेश
गेले अनेक दिवस चुकीच्या वीजबिलांमुळे नितीन राऊत यांच्यावर भाजपासह मनसेने जोरदार टीका केल्या होत्या, यावर वीजबिल जास्त आले आहे हा फक्त लोकांचा समज असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. तर, आज सकाळीच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर, “पंतप्रधान मोदी वगळता, भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर सर्वांना विश्वास आहे. मोदींच्या या भ्याडपणामुळे चीनने आपल्या भूभागावर कब्जा केला आहे आणि आता त्यांच्या खोटेपणामुळे तो भाग चीनकडेच जाईल”, या आशयाचे ट्विट करत जहरी टीका केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

