नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काल त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच होते.
राज्यभरातील व्यायमशाळा सूरु करण्याच्या दिशेने लवकरच निर्णय घेतला जाणार
दरम्यान, कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. शर्मिष्ठाने ट्विट केले आहे की, तिच्या वडिलांना अगदी एक वर्षापूर्वी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि आता एक वर्षानंतर ते गंभीर आजारी आहे. मुखर्जी यांनी ट्विट केले की, ‘माझ्या वडिलांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आल्याने मागील वर्षी ८ ऑगस्ट हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता. अगदी एक वर्षानंतर १० ऑगस्टला ते गंभीर आजारी पडले आहेत. देव त्यांच्यासाठी सर्व काही चांगले करु दे आणि मला जीवनातील सुख आणि दु: ख दोघांबाबत समान पद्धतीने स्वीकारण्याची शक्ती दे. त्यांची चिंता व्यक्त करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली ‘हि’ प्रतिक्रिया
रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठा गाठ आहे, ज्यासाठी त्यानी आपत्कालीन व्हेंटिलेटर शस्त्रक्रिया केली आहे. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे.डॉक्टरांची विशेष टीम सतत माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
विज बिल ग्राहकांना न्याय देणारा निर्णय घ्या, आमदार किशोर जोरगेवार यांची अजितदादांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
