🕒 1 min read
मुंबई : लॉकडाऊन काळापासून व्यायमशाळा बंद असल्याने व्यायमशाळा मालक व येथे काम करणा-या कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. त्यामूळे व्यायमशाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. तसेच सातत्याने त्यांच्याकडून सदर मागणीचा पाठपूरावाही सुरु होता. दरम्यान आज आ. जोरगेवार यांनी उपमूख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली असून व्यायमशाळा सुरु करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने उपायोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून व्यायमशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याचा मोठा फटका व्यायमशाळा मालकांसह येथे काम करणा-या कामगारांना बसला असून त्यांच्यापूढे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. येथे काम करणारे मॅनेजर, कोच, सफाई कर्मचारी हे बेरोजगार झालेले असून व्यवसायात गुंतलेली गुंतवणूक म्हणजे बँकेचे कर्ज, हॉलचे भाडे, इलेक्ट्रिक बिल, जिममध्ये काम करणारे कर्मचारी यांचे वेतन देण्यास जिम मालक असमर्थ झालेले असून स्वताच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हि बाब लक्षात घेत शती व अर्टींवर व्यायमशाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती.
या मागणीचा सतत पाठपूरावा त्यांच्याकडून केल्या जात होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्यभरातील व्यायमशाळा सुरु करण्याच्या दिशेने सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी याच मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली असून व्यायमशाळा मालक व तेथे काम करणा-या कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर राज्यभरातील व्यायमशाळा सूरु करण्याच्या दिशेने लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर उपमूख्यमंत्री अजीत पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशीही सदर विषयावर चर्चा केली असून राज्यभरातील व्यायमशाळा सुरु करण्याच्या दिशेने लवकरच रितसर आदेश पारीत करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी पुरवण्याबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय…
तुकाराम मुंढे यांनी सांगितले वाढत्या मृत्यूसंख्येचे नेमके कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
