Share

जय शिवराय: महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसवणार, कर्नाटक प्रशासनाचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

बेळगाव: बेळगावातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्टच्या रात्री काढण्यात आला. यानंतर, तिथल्या गावातील मराठी भाषिकांनी या गोष्टीचा विरोध करून आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून शिवभक्तांनी यावर संताप व्यक्त केला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणानंतर आता कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ८ दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्राम्हण व्होट बँकेवर नजर ठेवून मायावती उभारणार भगवान परशुरामाचा पुतळा

तर, सीमाभाग, कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात याचे तीव्र पडसाद उमटल्याचे काल, दिवसभरात दिसून आले. शिवभक्तांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलन केले. तर, कोल्हापूरमधील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरून कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला व कर्नाटकी गुंडांना शिवसैनिक चोख उत्तर देतील असं सांगत जर महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर, कोल्हापुरात एकाही कानडी व्यक्तीला राहू देणार नाही असा सज्जड दमचं दिला होता. दरम्यान, प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे मंत्री बच्चू कडू यांनी केले खुल्या दिलाने स्वागत

त्यामुळे, बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या घटनेनंतर बेळगावसह महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संतापले होते. रविवारी सकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. या सगळ्याची दखल घेत आता मनगुत्ती येथील स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. सर्व कायदेशीर बाबी तपासून पुतळा बसवू, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सचिन सावंत मराठा म्हणून जन्माला आले एवढंच खरं बाकी…मराठा समन्वय समितीने सावंतांना झापले

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!