Share

ब्राम्हण व्होट बँकेवर नजर ठेवून मायावती उभारणार भगवान परशुरामाचा पुतळा

Published On: 

लखनौ – ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण वर्गाच्या व्होट बँकेचा विचार करून परशुरामाचा पुतळा उभा करण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे.

उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचा सन्मान वाढवण्यासाठी भगवान परशुरामाचा भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट असेल तसेच तिची स्थापना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये उभारण्यात येईल.

मूर्ती उभारण्याच्या तयारीस समाजवादी पक्षाकडून सुरुवात झाली आहे. तसेच त्यासाठी सपाचे नेते जयपूर येथे पोहोचले आहेत. परशुराम चेतना ट्रस्टच्याअंतर्गत ही मूर्ती स्थापन केली जाईल.मूर्ती उभारण्यासाठी देशातील नामांकित मूर्तीकार अर्जुन प्रजापती आणि अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा निर्माण करणाऱ्या राजकुमार यांच्याशी चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशात ब्राम्हण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हे मतदार निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता सर्वच राजकीय वाटत असते यामुळेच गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात ब्राह्मण व्होटबँकेच्या राजकारणाने जोर पकडला आहे.दरम्यान, आता  ब्राह्मण मतांवर डोळा ठेऊन सत्तेत आल्यावर भगवान परशुरामाची भव्य मूर्ती उभारणार अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही केली आहे .

यावेळी मायावती यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाला जर भगवान परशुराम यांचा पुतळा उभारायचा असता तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उभारला असता. मात्र बसपा सपा सारखे करणार नाही, तर आम्ही जे बोलतो तेच करूनही दाखवतो, असेही मायावती म्हणाल्या.

राज्यात चार वेळा सत्तेत आलेल्या बसपा सरकारने सर्व जाती, धर्माच्या महान संतांच्या नावावर अनेक योजना सुरू केल्या होत्या, जिल्ह्याला त्यांची नावे दिली होती, मात्र सपा सरकारने जातीयवादी मानसिकतेतून आणि द्वेष भावनेतून या योजना, नावं बदलली. बसपा सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा पूर्वीसारखं करण्यात येईल असेही मायावती यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!