🕒 1 min read
सातारा: करोडो हिंदूंसह भारतीयांचे अनेक शतकांचे असलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. मागील वर्षाच्या अखेर राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्या नंतर २ दिवसांपूर्वी ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला. तर, यावेळी महाराष्ट्रवासीयांसाठी व शिवभक्तांसाठी एक अभिमानास्पद असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘श्रीराम मंदिर निर्माण कार्याचे उदाहरण इतिहासातील घटनांच्या आधारे स्पष्ट केले. “जसे खारी पासून ते वानर आणि आदिवासी असे सर्वांनाच रामाच्या विजयाचे साधन बनता आले, जसे श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलण्यास छोट्या छोट्या गावळींना मोठी भूमिका निभावली, ज्या प्रकारे मावळे छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणाचे शिल्पकार बनले, तसेच महाराजा सोहेलदेवांपासून ते स्वातंत्र्यासाठी गांधींना सर्वच वर्गातील देशभक्तांनी साथ दिली तशीच देशभरातील लोकांच्या मदतीने राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरु झाले आहे”.
मोदी सरकारने शब्द पाळला : देशातली पहिली किसान रेल्वे सेवा आजपासून होणार सुरु
त्यामुळे, या ऐतिहासिक सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींनी केलेला शिवछत्रपतीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान व गौरव असल्याच्या भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यांनी, ‘ प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे.’ असे ट्विट केले आहे.
आयपीएस विनय तिवारी क्वारंटाइनमुक्त,आजच बिहारला जाणार परत
प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे.@narendramodi pic.twitter.com/O0HEeoQUrk
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) August 6, 2020
राम मंदिराचे विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर “राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम”, असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असं नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं.
धक्कादायक : दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
