Share

धक्कादायक : दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली

Published On: 

नवी दिल्ली- भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाने भारतात थैमान घातले असून सरकार करत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत की काय असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला आपल्या देशात आतापर्यंत १३ लाखा ७८ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सहा लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा बळी गेला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!