नवी दिल्ली- नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी देशातली पहिली किसान रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत आहे. हि रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार असून यातून भाजी व फळांची वाहतूक होणार आहे.
यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार या रेल्वेसेवेचा प्रारंभ केल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.हि रेल्वेगाडी आज देवळाली स्थानकावरून निघून सुमारे ३२ तासांनी दानापूर इथं पोचेल.
पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप (PPP) याद्वारे कोल्ड चेन आणि शेतमालाची वाहतूक व विक्री करण्याची ही सेवा असणार आहे. कोल्ड सप्लाय चेन सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिली रेल्वे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांतील शेतकऱ्यांना जोडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार ही नवीन सेवा सुरू केली जात आहे. या रेल्वेद्वारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे यांची वाहतूक योग्य पद्धतीने करण्याची सोय केली जाणार आहे. या पहिल्या ट्रेनद्वारे नाशिक भागातील कांदा पटना, इलाहाबाद, कटनी, सतना या शहरात आणि त्या भागात पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.
या रेल्वेसेवेचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली असून नाशिक, मनमाड, भुसावळ इत्यादी परिसरातल्या फळे, फुले, कांदा तसंच भाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. यासाठी नाशिक जवळच्या लासलगाव इथं तापमान नियंत्रित गोदाम बांधण्याचे काम सुरु झालं आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी
मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी
राज्य सरकारची तत्परता;मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात
पावसाची तयारी आहे ड्रेनेज लाईनमध्ये जायची, पण ड्रेनेज लाईनची तयारी आहे का पावसाला सामावून घ्यायची ?

