Share

आठवीत असताना पाकिटात चिठ्ठी लिहून ठेवली, पठ्ठ्याने पहिल्याच दणक्यात कलेक्टर बनवून दाखवले

Published On: 

🕒 1 min read

बीड : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ (आर्थिकदृष्ट्या मागास) अंतर्गत 78 उमेदवारांची निवड झाली आहे. तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीडमधील मंदार पत्की या तरुणानं उज्ज्वल यश मिळवलं आहे. मंदार पत्की याने देशातून २२ वा क्रमांक पटकावून आयएएस व्हायचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. ‘वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळे सरकारी नोकरीबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला त्याबद्दल आणखी जास्त माहिती मिळाली. त्यामुळे आयएएस व्हायचं स्वप्न आणखी प्रबळ झालं.’ अस मंदार पत्कीने सांगितले.

राजीव गांधी असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता; आणखी एका काँग्रेसी नेत्याने केले राम मंदिराचे समर्थन

जिद्द आणि चिकाटी कशाला म्हणतात हे मंदारकडे पाहिल्यावर कळते. आठवीत असतानाच मंदार पत्कीने आयएएस व्हायचा घाट धरला होता. You Are checking the IAS officer pocket अशी चिठ्ठी त्यांनी आठवीत असताना पाकिटात ठेवली होती. आणि यां पठ्ठ्याने पहिल्याच दणक्यात कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

पुण्यातील बीआयटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं. शेवटच्या वर्षाला असताना UPSC ची तयारी सुरु केली. विकेंडला तो क्लासला जात असे. वर्षभरानंतर प्रयत्न केल्यानंतर मंदार UPSC परीक्षेत देशातून २२ वा आला आहे. मंदार पत्की याचं दहावीपर्यंतच शिक्षण बीडमधील संस्कार विद्यालयात पूर्ण झालं.

घरात सर्वच जण उच्च शिक्षित आहे. आई गृहिणी आहे. तर वडील सध्या निवृत्त आहेत. ते एमएसईसीबीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. मंदारला दोन मोठ्या बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं एमटेक झालं असून त्या पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. तर दुसरी मोठी बहीण पुण्यात मास्टर ऑफ सर्जरी करत आहे. मंदारच्या या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण असून शुभेच्छा देण्यासाठी घरी लोकांनी गर्दी केली आहे. मंदार पत्की यांनी पहिल्या प्रयत्नात मिळवलेलं यश, अनेक तरुणांना प्रेरणा देणारं आहे.

सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही; नारायण राणेंचा प्रहार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!