अयोध्या: भारताच्या पटलावर आणखी एक ऐतिहासिक घटना सद्या घडत आहे. करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर उभारण्यास सुरुवात होणार असून अवघ्या काही तासांवर हा ऐतिहासिक भूमीपूजनाचा कार्यक्रम आला आहे. तर, कोरोना काळात होणाऱ्या या सोहळ्यावरून काँग्रेस सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसत होते. मात्र, काही वेळापूर्वी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी एका पत्रकाद्वारे राम मंदिर निर्माणाच्या समर्थनानंतर अजून एका काँग्रेसी नेत्याने राम मंदिराचे स्वागत केले आहे.
संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला २०० जणांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात काँग्रेसचे नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणचं स्वागत करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही; नारायण राणेंचा प्रहार
कमलनाथ यांनी सांगितलं की, प्रभू राम सर्वांचे आहे, आता आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जर यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
#JusticeforSushantSingRajput : असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावं : शिवसेना
तर, प्रियंका गांधी यांनी पत्रकात, ‘ ‘अनेक युगांपासून भगवान श्रीरामाचे चरित्र भारतीय भूमीमध्ये मानवतेला जोडण्याचे काम करत आले आहे. भगवान राम आश्रय आहे आणि त्यागही. राम शबरीचाही आहे आणि सुग्रीवाचाही. राम वाल्मिकींचे आहेत आणि भासांचेसुद्धा आहेत. राम कबिरांचे आहेत आणि तुलसीदासांचेसुद्धा आहेत.’ असे भाव प्रकट केले आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली, पंतप्रधान कार्यालयात झाली नियुक्ती
तसेच, त्यांनी रामाच्या व्यक्तिगुणांचे वर्णन देखील केले आहे. ‘सरळमार्गीपणा, साहस, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू हे रामनामाचे सार आहे. राम सर्वांचे आहेत. सर्वांसोबत आहेत. भगवान राम आणि माता सीतेचा संदेश आणि त्यांची कृपा आणि रामलल्लांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक समरतेचा सोहळा बनू द्या,’ असे आवाहन प्रियंका गांधी यांनी ट्विटमधून केले.
दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असंही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

