🕒 1 min read
पुणे- कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. आयएमए चे अध्यक्ष यांनी भारतात कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
यासाठी लागणारे इंजेक्शन रेमडेसीवीर व इंजेक्शन टोसिलिझुमाब, देक्सामेथासोन व फेविपीरावीर या औषधापासून रुग्णांना उपचारात सुधारणा होता असल्याबाबत समोर आल्याचे डॉक्टर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे औषध विशेषतः रेमडेसिवीर’ ह्या औषधाची बाजारमध्ये उपलब्धता कमी आहे.हे औषध रुग्णांना माफक दारात औषध उपलब्ध करून देण्यात शासन प्रयत्न करत आहे. परंतु ही औषधे उपलब्ध होण्यास सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारे मोठ्या प्रमाणात कोव्हीड १९ वर उपलब्ध आणि उपयुक्त औषधे मोफत सर्व राज्य सरकारला देणे आवश्यक आहे. कोरोनामुळे सर्वच राज्याची आर्थिक परिस्थिती अधिक नाजूक बनली गेली आहे.
त्यामुळे केंद्र सरकारला कोव्हीड-१९ वर उपचारासाठी उपयुक्त औषधे इंजेक्शन रेमडेसीवीर व इंजेक्शन टोसिलिझुमाब, देक्सामेथासोन व फेविपीरावीर हे मोफत देण्याची विनंती आपण केंद्र शासनास करावी अशी विनंती शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदजी पवार यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे देखील यासंदर्भात पाठपुरावा आ.डॉ.गोऱ्हे ह्या करत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांना देखील पत्र लिहून मागणी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असचं भाजपला वाटतं आहे’
ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र
जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे
छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर
‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

