🕒 1 min read
मुंबई- राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
कोरोना सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन पेटले आहे. आंदोलक आता थेट रस्त्यावर आले असल्याचं पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना दानवे म्हणाले,राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे.
दानवे साहेब ,
भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात 'अमर-अकबर-अँथनी' कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत.
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा 'बंच ऑफ थॉट्स' मध्ये हिच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे.
बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी ! https://t.co/iVWHpqiB84
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 21, 2020
दरम्यान, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दानवेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. दानवे साहेब , भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हिच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी !
महत्वाच्या बातम्या-
जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे
छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर
‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय, ठाकरेंच्या समर्थनार्थ कॉंग्रेस मैदानात
दूध दरवाढ न केल्यास मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालू – पूजा मोरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

