🕒 1 min read
बीड(दि.21 जुलै) – दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी या गावात आज (ता.21 जुलै 2020 ) मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले.
स्वतः ‘स्वाभिमानी’चे युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा ताई मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी यांनी आज राज्यभर दूधबंद आंदोलनाची हाक दिली आहे.
यावेळी गायीच्या दुधासाठी पुढील 3 महिन्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे. केंद्र सरकारने 23 जूनला 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा. केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा व निर्यात अनुदान प्रतिकिलो 30 रुपये देण्यात यावे व दूध पावडर,तूप बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा या मागण्या करण्यात आल्या.
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून प्रचंड घोषणाबाजी केली.या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनात अच्युत मराठे, अशोक मोरे,आसाराम मराठे, गणेश मोरे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय, ठाकरेंच्या समर्थनार्थ कॉंग्रेस मैदानात
दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन
दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

