Share

गणेशोत्सवासाठी ७ ऑगस्टपर्यंत गावी या, अन्यथा १००० रुपये दंड; कोकणातील ग्रामपंचायतींचा मनमानी कारभार

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग: होळी व गणेशोत्सव हे कोकणातील दोन महत्वाचे सण मानले जातात. गणेशोत्सव म्हणलं कि लाखो चाकरमानी हे गौरी-गणपतीच्या सणाला गावी जात असतात. यंदा मात्र गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर देखील आहे. यावरून आता राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचे दिसून येत असून नेत्यांमध्ये देखील याचे पडसाद लक्षात घेता रस्सीखेच सुरु आहे. तर, कोणतीच नियमावली राज्य सरकारने जाहीर केली नसून गावी जाण्याची ठोस सोय नसल्याने चाकरमान्यांमध्ये अजून निराशा आहे.

क्वारंटाईन काळ १४ दिवसांचा, ७ दिवसांचा किंवा आणखी काही सूट मिळेल का यावरून संभ्रम अवस्था मात्र कायम असताना कोकणातील काही ग्रामपंचायतींनी राज्य सरकारच्या नियमावलीची वाट न बघता मनमानी कारभार चालवल्याचे दिसून येत आहे. ७ ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू, परंतु ७ ऑगस्ट नंतर आलात, तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे.

गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी

तसेच, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना बांद्याजवळील रोणापाल गावात येणाऱ्यांना ७ ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन ग्राम कृती दलाने केलं आहे. शासनाचे नियम बाजूला ठेवून स्थानिक ग्राम कृती दलाने घेतलेलेच निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील. असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला.

या महानगरपालिकेत परिचारिकांची मेगाभरती; नर्सिंगचे शिक्षण घेतलेले असेल तर असा करा अर्ज

गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणात आता क्वारंटाईन वरुन पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे. क्वारंटाईनचा कालावधी १४ वरून ७ दिवसाचा करावा, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर विरोधी पक्ष भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्वारंटाईन कालावधी असूच नये, अशी मागणी केली आहे. मात्र १४ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी हवाच अशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची ठाम भूमिका आहे. यामुळे इथे आड तिथे विहिर अशी अवस्था चाकरमान्यांची झाली आहे.

‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना

तर, एकीकडे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने काहीसा दिलासा दिला असून नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करणे शक्य असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता, कोकणातील खासदार, आमदारांसह, नेत्यांनी एकत्र येऊन सर्व अटी, नियम लवकरात लवकर चाकरमान्यांची सोय करावी अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपा सह मनसेकडून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!