Share

‘या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना

Published On: 

क्रीडा : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकावं आता क्रीडा विश्वात देखील झालेला दिसून येत आहे. फुटबॉलपटूंमध्ये हे प्रमाण अधिक आहे. क्रिकेटलाही याची झळ सोसावी लागली आहे. नुकतेच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनचे वडील मश्रुफ रेझा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनचे वडील मश्रुफ रेझा यांना कोरोनाची लागण झाली असून त्याच्या आईची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे, रविवारी वडिलांचा कोरोना रिपोर्ट समोर आला आहे, पण आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. शकिबच्या वडिलांना मागील काही दिवसांपासून सर्दी ताप झाला होता. ”ते बँकेत काम करतात.. त्यांच्याआधी 6-7 लोकांना कोरोना झाला होता. त्यानंतर वडिलांची चाचणी करण्यात आली आणि आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,”असे शकिबची चुलत बहिण सोहननं सांगितले. असे वृत्त लोकमतने दिले आहे.

दरम्यान, बांगलादेशमध्ये 2 लाख 4525 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 2618 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. 1 लाख 11,642 रुग्ण बरे झाले आहेत. शकिब सध्या लंडनमध्ये आहे आणि तो देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून बांगलादेशमधील कोरोनाबाधीत लोकांना मदत करत आहे.

धक्कादायक; सौरव गांगुली होणार होम क्वारंटाईन; कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

जयने केली विरूसाठी प्रार्थना

बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!