Share

‘भाजपचा भ्रम लवकरच तुटेल,देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि नागरिकांच्या हलगर्जीपणा यामुळे देशात स्थिती आणखी बिकट बनली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखाच्या पलिकडे गेला आहे. त्यातच आता भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे

या सर्व प्रकारामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान,  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी यांनी याविषयी एक ट्विट करत भाजपवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार करत आहे. भाजपने कोरोना चाचणी करण्यावर निर्बंध लावले आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चुकीची सांगितली. जीडीपी मोजण्यासाठी नव्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. चिनी आक्रमणावर पांघरुन घालण्यासाठी माध्यमांना भीती दाखवण्यात आली. भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.’

महत्वाच्या बातम्या-

छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

‘मंत्र्यांसाठीची वाहन खरेदीची फाईल क्लिअर होतेय मात्र, कोरोना योद्ध्यांच्या वेतनाची फाईल अडकून राहतेय’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!