Share

‘बिग बी व अभिषेकच्या डिस्चार्ज देण्याबाबत नानावटी रुग्णालयाने दिली ‘ही’ माहिती

Published On: 

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना ‘नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार’? या संदर्भात नानावटी रुग्णालयाने माहिती दिली आहे. दोघांवर उपचार सुरू असून पुढील सात दिवस तरी त्यांना रुग्णालयातच राहावं लागणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने ‘पीटीआय’शी बोलताना दिली. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे.

बच्चन यांना केलं आइसोलेशन वार्डात शिफ्ट, उत्तम प्रकृतीसाठी मध्य प्रदेशात पूजा

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; तर राज्यपाल क्वारंटाइन!

बिग बी अपघातातून बचावले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!