Share

बच्चन यांना केलं आइसोलेशन वार्डात शिफ्ट, उत्तम प्रकृतीसाठी मध्य प्रदेशात पूजा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई -अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री उशीरा बिग बींनी ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं नानावटी रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना रुग्णालयाच्या आइसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेऊन आहे.

बच्चन यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले आहे की, माझ्या प्रकृतीबाबत सतत ट्विटरद्वारे माहिती देत रहा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची हल्की लक्षणे आहेत. तसेच सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

यामध्येच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात बिग बी आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात येत आहे. ‘एएनआय’ने ट्विट करत ही माहिती दिली. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

जिल्हयात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांची तात्काळ माहीती द्या – डीवायएसपी टिपरसे

अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!