🕒 1 min read
मुंबई: गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय वापरला जात आहे. तर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाने कहर केला आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता.
अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही, राऊतांचा भाजपला टोला
त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप ४५ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाइन राहत आहे.
यासोबतच काल रात्री उशिरा, महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिलीय. तर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची देखील टेस्ट करण्यात आली असून त्यात अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, अभिनेत्री जया बच्चन, आणि अभिषेख यांची मुलगी अराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर ‘माझ्या संपर्कात मागील 10 दिवसांत जे लोक आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन अमिताभ यांनी केली आहे.
आमचा विद्यार्थी सहामाही पास झालायं, प्रॅक्टिकल अजून बाकी आहे – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
