Share

अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.आता बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच नाही तर त्यांचा भाऊ, वहिनी आणि पुतणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुपम खेर यांनी स्वत: एक व्हिडीओ जारी करत ही माहिती दिली आहे.

अनुपम खेर यांनी या व्हिडीओत सांगितले कि, ‘मित्रांनो, माझी आई जिला तुम्ही दुलारी नावाने ओळखता ती गेल्या काही दिवसांपासून काहीही खात-पीत नव्हती. तिची प्रकृती बघता डॉक्टरांनी आम्हाला तिची कोरोना टेस्ट करण्याचे सुचवले. तिची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे आईसोबत होतो. त्यामुळे आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट झाली. माझ्या भावाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. माझी टेस्ट मात्र निगेटीव्ह आली. भावाच्या कुटुंबाचीही टेस्ट करण्यात आली. यात माझी वहिनी आणि माझी पुतणी या दोघींनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. माझा भाचा मात्र निगेटीव्ह आढळला. माझ्या आईला कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही बीएमसीला कळवण्यात आले आहे. याबाबत मी तुम्हाला माहित देणे, माझे कर्तव्य आहे’.

पुढे त्यानी आवाहन केले कि, तुम्हीही तुमच्या कुटुंबातील वडिलधा-या माणसांची प्राधान्याने चाचणी करा. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व प्रार्थनांनी माझे कुटुंबीय लवकरच या आजारातून बरे होईल, असा मला विश्वास आहे’.

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; तर राज्यपाल क्वारंटाइन!

महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा

मोठी बातमी : टिक टॉक, युसी ब्राऊझर सह 59 चिनी अॅप्स वर बंदी; भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!