Share

‘नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेला धक्का देणारे व महाविकास आघाडीतील नाराजीनाट्याला कारणीभूत ठरलेले पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे. या सर्व नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.

या संपूर्ण घडामोडींवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार शरसंधान साधलं आहे. ‘अजितदादांनी पारनेरचे ‘ते’ पाच नगरसेवक मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले या शीर्षकाची बातमी वाचली. सेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले, आता पुन्हा सेनेकडे… नगरसेवक म्हणजे कूरिअरवाल्याकडचे ‘पार्सल’ आहे का एकाकडून दुसऱ्याकडे सोपवायला’ ? असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

दरम्यान, पारनेरमधील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यातील अंतर्गत राजकारणातून तेथील नगर पंचायतीतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खुद्द अजित पवारांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते. ते विरोधी पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचा खुलासा आमदार लंके यांनी या प्रकरणावर केला होता. वरिष्ठांशी चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी या पक्षांतरामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

राज्यात खांद्याला खांदा लावून सरकार चालवणाऱ्या पक्षांमध्ये सरकार स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच रंगलेला हा फोडाफोडीचा खेळ चर्चेचा विषय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घडामोडींमुळं कमालीचे नाराज झाले होते. आमचे फोडलेले नगरसेवक परत करा, असा निरोप ठाकरे यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर आज महत्त्वूपर्ण घडामोडी घडल्या. या नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले. तिथं प्रथम पवार आणि नंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले.

इंदुरीकर महाराजांसाठी भाजपचा ‘हा’ बडा नेता उतरणार रस्त्यावर

धक्कादायक : दहावीची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

कोणाचा मंत्री कुठे फिरतोय, हे मुख्यमंत्र्यांचं कळेना ; सुजय विखेंचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!