अहमदनगर : ‘राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. मात्र, दुर्देवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते,’ असा टोला अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारकडे सध्या पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत. राज्याचे सचिव वेगळा नियम काढतात. मुख्यमंत्री वेगळा जीआर काढतात. महसूलमंत्री वेगळाच जीआर काढतात. तर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही,’ अशी टोलेबाजी सुजय विखे यांनी केली.
करोनाच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचा विचार करता केंद्राच्या निधीतून ५० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून करोनाच्या अनुषंगाने राज्यातील रुग्णालयांना वेगवेगळे मेडिकल इक्यूमेंट दिले जात आहेत. पीपीई कीट दिले जात आहेत, मास्क दिले जात आहेत. हॉस्पिटलसाठी इक्यूमेंट देणे हे सुद्धा खर्चिक काम आहे. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आतापर्यंत राज्यातील २५लाख ७७ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त !
मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

