🕒 1 min read
नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत.
Vikas Dubey was going to Ujjain Mahakal temple when he was identified by security personnel. Police were informed, he confessed his identity after being pushed for it. He has been apprehended by police & interrogation is underway: Ashish Singh, Ujjain Collector #MadhyaPradesh https://t.co/tBNHn3pwuw
— ANI (@ANI) July 9, 2020
महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता.
पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. विकास दुबे याला महाकाल पोलीस ठाण्यात आणले आहे. आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनंतर एसटीएफची टीम उज्जैनला रवाना झाली आहे.दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा विकास दुबे याचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर दुबे याला हमीरपूरजवळ झालेल्या एका चकमकीत एसटीएफने ठार केलं.
धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, ‘त्या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार फेलोशिप
शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये, ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
‘बाळासाहेब ठाकरेंच्या कामाची पद्धत भाजपाच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
