Share

‘सामना’तून पडळकरांना धडे देणे म्हणजे शशी थरूर यांनी ब्रह्मचर्याचे धडे देण्यासारखे…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची मन की बात’ तर नाही ना अशी शंका ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला.

सामनाच्या या अग्रलेखानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखावर घणाघाती टीका केली आहे. ‘सामनाच्या अग्रलेखात गोपीचंद पडळकरांना चांगली भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे नेमकी कशी ? पंतप्रधानांचा बाप काढलेला तशी का? की ‘भाजप नेते तेव्हा गोधड्या भिजवत होते काय?’ अशी ? पडळकरांना सामनाने धडे देणे म्हणजे शशी थरूर यांनी ब्रह्मचर्याचे धडे देण्यासारखे आहे.’ असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह ‘ग्रँड एण्ट्री’, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

कोरोनाशी झुंजत असताना पंकजाताईने फोन केल्याच्या आनंद झाला, धनुभाऊ झाले भावूक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!