सांगली : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची ‘ग्रँड एण्ट्री’ झाली.
धनगर समाजाकडून पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी पडळकर समर्थकांनी नमूद केलं. पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. सांगलीमध्ये देखील गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला आहे.
कोरोनाशी झुंजत असताना पंकजाताईने फोन केल्याच्या आनंद झाला, धनुभाऊ झाले भावूक
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये धडाकेबाज एण्ट्री केली. जतमध्ये 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासोबत गोपीचंद पडळकर यांची एण्ट्री झाली. जतमध्ये पडळकर यांचा सत्कार झाला. गाड्यांच्या ताफ्यासहित शेकडो कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी, पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच छंद गोपीचंद… अशी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे.
धनगर आरक्षण समितीचा आमदार पडळकरांना दणका, घेतला हा निर्णय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

