Share

मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3721 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,35,796 वर गेली आहे. तर दिवसभरात 62 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1962रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.शासनाकडून सर्व उपाय करून देखील कोरोना वाढतच असल्याचे चित्र आहे. दादर परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शिवसेना भवन पुढील काही दिवसांसाठी खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शिवसेना मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवसैनिकांकडून गरजू आणि गरिबांना मदत पुरवली जात आहे. त्यामुळे शेकडो शिवसैनिक सध्या मदतकार्याचे काम करत आहे. अनेक शिवसैनिकांची शिवसेना भवनावर ये जा सुरू असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिस्थितीला पायाशी झुकवलं, भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2,300 वर

भाजपची घोडदौड सुरूच, राज्यसभेत ताकत वाढली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!