Share

भाजपची घोडदौड सुरूच, राज्यसभेत ताकत वाढली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील आठ राज्यात राज्यसभेच्या 19 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला आठ जागावर विजय मिळाला आहे. तर कॅाग्रेस 4 जागा जिंकल्या आहेत. भाजपला गुजरातमध्ये तीन, मध्यप्रदेशमध्ये दोन आणि राजस्थान, झारखंड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे. तर कॅाग्रेसला राजस्थानमध्ये दोन आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एक एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण न करणाऱ्या गुतेदारांवर गुन्हे दाखल करा- अमित देशमुख

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले. यामुळे वरिष्ठ सदनातील पक्षाची ताकतदेखील वाढली आहे. ताज्या निकालानंतर भाजपचे राज्यसभेतले संख्याबळ 86 वर गेले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ 41 वर आले आहे. निवडणूकीत जास्त जागा मिळवूनही भाजप वरिष्ठ सभागृहातमध्ये बहुमतापासून दूर आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार – आव्हाड

दरम्यान, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश यांनी विजय मिळवला. आंध्र प्रदेशात पिल्ली सुभाष चंद्र बोस, मोपिदेवी वेंकट रामणा, परिमल नाथवानी आणि अयोध्या रामी रेड्डी हे वायएसआरचे चारही उमेदवार यशस्वी ठरले. तर ईशान्येत मेघालय आणि मिझोराम राज्यांमध्ये सत्ताधारी आघाड्यांनीच विजय मिळवत आपले उमेदवार राज्यसभेत पाठवले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!