🕒 1 min read
पुणे :- पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2,300 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात काल दिवसभरात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 127 जणांचा कोरोनानमुळे मृत्यू झाला आहे.
तसेच धक्कादायक बाब म्हणजे पुणे जिल्ह्यात बुधवारी 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आतापर्यंत 118 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर दिवसभरात 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात सध्या 1,324 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी 79 हे क्रिटिकल आहेत. तर 18 कोरोना रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 90 हजार 879 नमुन्यांपैकी 1 लाख 73 हजार 838 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 16,758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 11 हजार 112 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 13 हजार 107 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3094 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

