Share

भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर – काही दिवसांपूर्वी विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निर्णयाबाबत आपल्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचं भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट’ असताना, माझे चिरंजीव डॉ. सुजय यांना तिकीट नाकारले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी माझाही निर्णय झाला होता. राज्यात सत्तेत आलेले आघाडी सरकार हा अपघात आहे. भाजप प्रवेशाचा माझा निर्णय योग्यच होता आणि त्याबाबत मला किंचितही पश्चात्ताप होत नाही.

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या अन्य नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू.यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर देखील तोफ डागली आहे. राज्य सरकारने लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका त्यांनी केली .

शेती आणि शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिला नाही. यापूर्वी सत्तेत असताना आपण थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोचविण्याचा उपक्रम यशस्वी केला. लॉकडाउनच्या काळातही हे शक्य होते. या संकट काळात सर्वांना विश्वासात घ्या, अनुभवांचे आदान-प्रदान करा. शेतकऱ्यांना वाचवा, अशी मागणी करणारी आठ-दहा पत्रे आपण मुख्यमंत्री व सरकारला पाठविली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या सरकारला ग्रामीण भागाशी काहीच देणे घेणे नाही असं ते म्हणाले.

मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिनसलं ? कॉंग्रेसच्या मंत्र्यांची तातडीची बैठक…

रबी पेरणीसाठी हेक्टरी पंचवीस हजार मदत करा, अन्यथा आंदोलन करू – स्वाभिमानी

ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी शासन हमी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!