🕒 1 min read
मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याने माध्यमांनी या बातम्या दाखवायला सुरुवात केली. या बातम्या समोर येताच मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.आव्हाड यांनी यांनी अर्धवट बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगितला जातो. पण त्यातील ५० हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळलं जातं. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे, असा आरोप करतानाच गुजरातचा मृत्युदर सांगा की, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे.
गुजरातचा मृत्युदर सांगा की!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2020
दरम्यान, राज्यात रविवारी कोरोनाच्या 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात काल 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर एकाच दिवशी 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा 3950 वर पोहोचला आहे.
#coronavirus : राज्यात एकाच दिवशी ८,३८१ रुग्ण कोरोनामुक्त
कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची ‘ठाकरे सरकार’वर घणाघाती टीका
सोनु सूदने मजुरांना दिला मदतीचा हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
