Share

सोनु सूदने मजुरांना दिला मदतीचा हात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लॉकडाउनचा काळ देखील वाढत चालला आहे. त्यामुळे हजारो मजूर विविध राज्यांत अडकले आहेत. त्यांना त्याच्या घरी सोडवण्याची जबाबदारी आता अभिनेता सोनु सूदने पण घेतली आहे. “जो पर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही.” असा निश्चय त्याने केला आहे.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

सोनु सूदच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

पहा, रिंकूला कशाची चिंता सतावतेय

नवाजुद्दीन सिद्दिकीला कुटुंबीयांसह केलं क्वारंटाइन

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!