Share

अरविंद केजारीवालांची तब्ब्येत अचानक बिघडली, कोरोनाची टेस्ट होणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

बोलता-बोलता गृहमंत्र्यांना कळले आज आहे पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस, आणि मग…

विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

गेल्या काही दिवसात दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्त्यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माध्यम केंद्र आगामी 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

दिलासादायक : हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत कोरोनामुळे आठडयाभरात एकही मृत्यू नाही

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 654 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात येथे 1320 रुग्ण वाढले आहेत. तर 761 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण 219 कंटेनमेंट झोन आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक जूननंतर रोज 1200 हून अधिक रुग्ण वाढत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!