पुणे : कोरोना महामारीच्या काळात पोलीस हे खऱ्या योध्या प्रमाणे आपल्यासाठी रात्रंदिवस उभे आहेत. मग यात त्यांना सण ना वाढदिवस… मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला वाढदिवसाचं भन्नाट ‘गिफ्ट’ दिलं आहे.
मुंबई महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुण्याहून मुंबईला जात असताना समजले. हे कळल्यावर ते काही काळ रस्त्यावर थांबले जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या. एवढंच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन त्यांनी उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना आपल्या हाताने केक देखील भरवला.
आज पुण्यावरुन मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेवर किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधतांना समजले की उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/J1me2uVssP
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 8, 2020
खुद्द गृहमंत्र्यांने आपला वाढदिवस साजरा करण्याचे ‘गिफ्ट’ श्रीकांत जाधव यांना मिळाले. त्यामुळे साहजिकच ते भारावून गेले होते. गृहमंत्री अनिल देशमुख हे कायमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये, पोलिसांमध्ये मिसळतात. राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन असतानाही देशमुख यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे २४ जिल्ह्यांचा दौरा करुन तेथील पोलिसांचे मनोबल वाढवले. आपल्या दौऱ्यात त्यांनी बंदोबस्त ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

