Share

कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याला मिळाली राज्यसभेची उमेदवारी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 18 रिक्त जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. यासंदर्भात नुकतीच निवडणूक आयोगाने घोषणा केली. या जागांसाठी मार्च महिन्यातच मतदान होणार होते. मात्र, कोरोना व्हायरस महामारी आणि देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ते टाळण्यात आले. मात्र, आता लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली जात असल्याने निवडणूक आयोगाने या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

अजित पवार शांत कसे?; त्यांच्याकडून खाड-खाड निर्णय अपेक्षित- पाटील

सतराव्या लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसने कर्नाटकातून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खरगे यांचा गुलबर्गा मतदारसंघात पराभव झाला होता. पण ते वर्षभरानंतर राज्यसभेत जाण्याची तयारी करत आहेत.

अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, वितरणासाठी वाहतूक व्यवस्था सज्ज; ट्रम्प यांचा दावा

दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एक जागा रोखण्याची रणनीती काँग्रेसने आखली असून राज्यसभेच्या कर्नाटकातील जागेसाठी काँग्रेस जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांना पाठिंबा देण्याच्या विचारात आहे. देवेगौडा कर्नाटकातून राज्यसभेवर गेल्यास भाजपची एक जागा पर्यायाने कमी होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!