Share

परराज्यात काम करणार्‍या महिलांचे शोषण होते- हेमंत सोरेन

Published On: 

रांची : कामासाठी दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी झारखंड राज्य सरकारची परवानगी घ्यावी, असे आवाहन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे. परराज्यात काम करणार्‍या कामगारांची माहिती राज्य सरकारकडे असायला हवी, जेणेकरून अशा कामगारांना काही त्रास झाला तर सरकार मदत करू शकेल. यासंदर्भात राज्य सरकार आदेश काढणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

स्थलातरित कामगारांच्या प्रश्नावरून महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात शाब्दिक चकमकही झाली होती. लॉकडाऊन दरम्यान उत्तरप्रदेशातील स्थलांतरित कामगारांना ज्या प्रकारे त्रास झाला आणि त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचे गैरवर्तन झाले त्या पाहता त्यांच्या सामाजिक सुरक्षेची हमी घेत राज्य सरकार हे जाहीर करत आहे की, इथून पुढे कोणतेही राज्य परवानगीविना उत्तर प्रदेशच्या मजुरांना घेऊ शकत नाही, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते . जर एखाद्या राज्याला कामगारांची गरज भासल्यास, त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकार सामाजिक सुरक्षेची हमी देईल, विमा प्रदान करेल आणि कामगार आणि कामगारांना सर्व प्रकारचे संरक्षण देईल, असे आदित्यनाथ म्हणाले होते.

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात…

योगींच्या या वक्तव्याने मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला होता.

‘सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून यशस्वी कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे’

आता सोरेन यांनी देखील योगींच्या सुरात सूर मिसळला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले,परराज्यात कामानिमित्त जाणार्‍या कामगारांनी बाहेर जाण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी. दुसर्‍या राज्यात असलेल्या कामगारांना काही समस्या आल्या अथवा प्रश्न निर्माण झाले, तर त्यांची मदत करण्यासाठी सरकारकडे ही माहिती असायला हवी, असे सोरेन म्हणाले. कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार आदेश जारी करणार आहे. विशेषतः परराज्यात काम करणार्‍या महिलांचे शोषण होते, असेही म्हणाले.दैनिक प्रभातने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!