Share

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात…

Published On: 

मुंबई : ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही, निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही आ आरोप ज्यांच्यावर सातत्याने होत असतो त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील सगळ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकत देशातील टाॅप पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत जागा मिळवली आहे.

कोरोना नंतर आपल्याला ‘हे’ करावचं लागेल, अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

सी व्होटरतर्फे भारतातील प्रसिद्ध नेत्यांबद्दल एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा देखील आढावा घेण्यात आला होता. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पकडून तीन हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांचा नंबर पाचव्या क्रमांकावर आलाय. महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुण मिळवले आहेत. यात विशेष बाब म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकही भाजपचा मुख्यमंत्री नाहीये.

दरम्यान, यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले,लोकप्रिय मुख्यंंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझं एकट्याचं यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचं हे राज्य पुढं नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे फक्त निमित्त आहे महाराष्ट्र राज्याची सेवा घडते आहे हे महत्त्वाचं. लोकप्रिययतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिलं राज्य कसं करता येईल हे माझं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

‘रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’

महाारष्ट्राच्या जनतेने संकटकाळात विश्वास दाखवला. तसंच माझ्या मंत्रिमंडळाने आणि अधिकाऱ्यांचे देखील… त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे आभार अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि मॉंसाहेबांच्या आशीर्वादशिवाय ही झेप घेणं शक्य नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना देखील आनंद झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आनंदी होत उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!