Share

भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना परास्त केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही, निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही आ आरोप ज्यांच्यावर सातत्याने होत असतो त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील सगळ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकत देशातील टाॅप पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत जागा मिळवली आहे.

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती होऊ शकते?

सी व्होटरतर्फे भारतातील प्रसिद्ध नेत्यांबद्दल एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा देखील आढावा घेण्यात आला होता. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पकडून तीन हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांचा नंबर पाचव्या क्रमांकावर आलाय. महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुण मिळवले आहेत. यात विशेष बाब म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकही भाजपचा मुख्यमंत्री नाहीये.

दरम्यान, या सर्व्हेमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक- ८३ टक्के, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल – ८१ टक्के, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन – ८० टक्के, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी – ७८ टक्के, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – ७६ टक्के, दिल्लीचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल – ७४ टक्के पसंती मिळाली आहे.

कोरोना चाचण्यांची संख्या 50 टक्क्यांहून कमी, फडणवीसांनी व्यक्त केली बळींच्या वाढत्या संख्येवर चिंता

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे फेसबुक पोस्टद्वारे म्हणाले की, मुख्यमंत्री हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

https://www.facebook.com/UddhavBalasahebThackeray/posts/3011063605675652

विधानसभा २०१९, एका अशी निवडणूक ज्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला. महाराष्ट्राला जे वाटलं नव्हतं ते सर्वाकाही घडलं. महाविकास आघाडीच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या गेल्यात आणि ठाकरे घराण्यातील पहिलीवहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ताबा घेतल्यांनंतर उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा थेट अनुभव नाही, महाराष्ट्राची जबाबदारी आणि मुख्यत्त्वे विरोधकांचा सामना उद्धव ठाकरे कसा करतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र यां सर्व्हेत तरी उद्धव ठाकरे पास झाले आहेत असच चित्र आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!