Share

क्वारंटाईनचा कोल्हापुरी पॅटर्न : निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात राहावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने हे गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातील सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी राहायचे. शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यापासून याची सुरूवात होणार आहे.

रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार धैर्यशील माने यांनी नवा पॅटर्न करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये ते राहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे घर रिकामे करायचे आणि त्या घरात रहात असणाऱ्या त्यांच्या सदस्यांनी आपल्या भाऊबंदांकडे किंवा शेजाऱ्यांकडे राहायचे. पुढील 14 दिवस संपर्कात यायचे नाही. त्या घरावर फलक लावून त्यावर अलगीकरण कालावधी लिहायचा. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय त्यांच्या घरच्या लोकांनीच करायची.

येणाऱ्या लोकांची सोय करण्यात प्रशासनाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या मदतीने या नव्या पॅटर्नची सुरूवात शाहुवाडी-पन्हाळा येथून सुरूवात करत आहोत. घरच्या लोकांनी आपल्या, गावाच्या सुरक्षिततेसाठी घर रिकामे करून बाहेरून येणाऱ्या आपल्याच लोकांना द्यावे आणि काही दिवस दक्षता घ्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी या नव्या पॅटर्नच्या निमित्ताने केले आहे. या नव्या पॅटर्नमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामास मदत होईल. कुटुंबाला, पर्यायाने गावाला धोका होणार नाही. सामाजिक बांधिलकी, एकोपा वृद्धिंगत होण्यास मदत होईल आणि अलगीकरणाच्या तंतोतंत पालनास होणार मदत होईल.

मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा ‘हा’ हटके लुक एकदा पाहाच

#coronavirus : ‘लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही’

आरोग्य सल्ला : पाणी कसं आणि केव्हा प्यावं?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!